अकोला : मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनेच टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय... ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी अकोल्यातील शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे बोलत होते. मुंबईत काँग्रेसच्या भूमिकेमूळे राष्ट्रवादीला नाईलाजाने आघाडीविनाच लढावं लागत असल्याचा आरोप तटकरेंनी केलाय. दरम्यान, किरकोळ जागा घेवून आघाडी करू शकत नाही, असं सांगत तटकरेंनी काँग्रेसला त्यांनी ठणकावलंय. मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अकोल्यात होतेय.


गुलाबराव गावंडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश


अकोल्यातील शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावेळी अकोल्यातील बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. विदर्भातील शिवसेना बांधणीत गुलाबराव गावंडे यांचा मोठा वाटा आहेय. गावंडे हे युती सरकारच्या काळात राज्यमंत्री होतेय. तर शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा तीन वेगवेगळ्या मतदार संघातून विजयी झाले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना हुजऱ्यांनी घेरल्याची टिका गुलाबराव गावंडे यांनी केलीय.


काँग्रेसच्या ताठर भूमिकेमुळे आघाडी नाही


या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तटकरेंनी आघाडीवर मतं व्यक्त केलंय. राज्यात आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची भूमिका, आघाडीचे अधिकार स्थानिक स्तरावर दिल्याचं तटकरेंनी सांगितलंय. मुंबईत काँग्रेसची इच्छा नसल्याने आघाडी होवू शकली नाहीय. किरकोळ जागा घेवून आघाडी करू शकत नाही. यासंदर्भात अशोक चव्हाणांनी मुंबईत आघाडी न होण्याचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं होतं. 


या संदर्भात निरूपम-अशोक चव्हाणांचा संवाद झाला की नाही माहित नाही, असं म्हणत दोन्ही नेत्यांना टोला लगावला. राजकारणात ताठर भूमिका घेवून चालत नाही, असं म्हणत तटकरेंनी काँग्रेसला फटकारलंय. दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर तटकरे कुटुंबिय आता एकदिलाने काम करणार असल्याचं सांगतानाच अंतर्गत सर्वच वादांवर आता पडदा पडल्याचं सुनिल तटकरे यांनी सांगितलंय.