जळगाव : हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच हुंडा विरोधात कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली. १ मेपासून मराठवाड्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत हुंडा विरोधात जागर कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 


या बरोबरच शेतकरी आत्महत्या आणि स्त्री भ्रूणहत्येवरतीही जागर करणार असल्याचं त्या म्हणाल्या.