नाशिक : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे. नाशिक आणि पुणे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाआघाडीतील दुरावा झाला वाढत चालला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपने विश्वासात घेतले नाही, साधी चर्चाही केली आहे. उलट युती नसताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फोटो, प्रचारात वापरत असल्याचा आरोप स्वाभीमानी संघटनेकडून करण्यात आला आहे.


भाजपने राजकारण करत स्वाभिमानी संघटनेची फसवणूक केली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी थेट शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी अधिक वाढली आहे.


ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसेच कांद्याचे आंदोलनांबाबत भाजपविरोधात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला दूर करत शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय स्वाभिमानी संघटनेकडून घेण्यात आला.