मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
खोपोली : मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
राज्यात मराठा समाजाचे मोर्चे पाहता इतर समाजाला आहे ते आरक्षण कायम ठेवून सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल. यातून कोणत्याही समाजावर अन्याय होण्याचा प्रश्न नाही, असे पवार म्हणालेत.
सध्या निघत असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे आंदोलनांची नवीन परिभाषा ठरत आहेत. या मोर्चांना होणारी गर्दी पाहता सरकारने आता वेळ न लावता मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, असे पवार म्हणालेत. खोपोली नगरपालिकेने उभारलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवनाचे तसेच इतर विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार बोलत होते.