मंत्री पंकजा यांची `ऑडिओ धमकी` ने वाद, राजीनामा घ्या : धनंजय
कथित ऑडिओ क्लीपवरून आता बाल विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बीड : कथित ऑडिओ क्लीपवरून आता बाल विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पंकजा मुंडे यांच्या ऑडिओ क्लीपमधून धमक्यांची भाषा समोर आली आहे. त्यामुळं त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
खडसेंचा राजीनामा घेतला जातो तर पंकजांचा का नाही? खडसेंपेक्षा हे प्रकरण गंभीर असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या धमकीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचीही जबाबदारी तेवढीच वाढते, त्यामुळे राजीनामा घेणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे धनंजय मुंडे म्हणालेत.