मुंबई अहमदाबाद हायवेवर केमिकल टँकरला आग
मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर जवळ केमिकलच्या टँकरला भीषण अपघात झालाय. मेंढवण येथे हा अपघात झालाय.
पालघर : मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर जवळ केमिकलच्या टँकरला भीषण अपघात झालाय. मेंढवण येथे हा अपघात झालाय.
ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यानं सुटल्याने टँकर पलटी झाला आणि त्यानंतर टँकरनं पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
मात्र या अपघातामुळे या मार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालीये. सध्या या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीन सुरु करण्यात आलीये.