बारामती : शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या साक्षीनं संपूर्ण कुटुंबानं एकत्र काम करण्याची ग्वाही दिलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबात मध्यंतरी प्रचंड वाद निर्माण झाले होते. त्यामुळं राष्ट्रवादीला काही प्रमाणात फटकाही बसला होता.


मात्र, आज सुनील तटकरे यांनी आपल्या बंधू आणि पुतण्यांसमवेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती इथं भेट घेत सर्वजण एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिलीय.


तर शरद पवार यांनीही याबद्दल समाधान व्यक्त करत तटकरे कुटुंबियांच्या एकत्र येण्याचा प्रत्यय निवडणुकांमध्ये दिसेल असा विश्वास व्यक्त केलाय.