निफाड : उत्तरेमध्ये सुरु असलेल्या हिमवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे निफाड येथील तापमानाचा पारा घसरलाय. शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरूय. त्याचा परिणाम राज्यात जाणवायला लागवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं आज सकाळचं तापमान 8.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. शुक्रवारी इथलं तापमान 9.8 तर शनिवारी 10.4 अंश सेल्सिअसइतकं होतं तर साता-यात महाबळेश्वरमध्येही पारा खाली घसरलाय. 


महाबळेश्वरमधलं तापमान सकाळी शुन्य अंशांवर घसरलं होतं. वेण्णा लेक, लिंगमळा, स्मृतीवन या परिसरात दवबिंदु गोठले होते. सलग सुट्यांमुळे पर्य़टकांची  महाबळेश्वमध्ये मोठी गर्दी आहे, शिवाय ऐन मार्च महिन्यात या पर्टकांना सुखद गारवा अमनुभवायला मिळतोय. त्यामुळं त्यांच्या आनंदाला उधाण आलंय. सध्या महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर आलंय.