ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत प्राणी मित्रांकडून बेजबाबदारपणे गाडी चालवत कुत्र्याला उडवल्याची तक्रार वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 


पोलिसांनी गाडीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.