कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव निलंबित, वियभंग केल्याचा आरोप
ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे वादग्रस्त कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे : मध्यवर्ती कारागृहाचे वादग्रस्त कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याच कार्यालयात कामाला असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलनं त्यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे.
गेल्या 26 ऑगस्टला रात्री जाधव यांनी कामाच्या बहाण्याने कळवा ब्रिज इथे बोलवून घेतले आणि आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या महिला पोलिसाने केला आहे.
तिच्या तक्रारीवरुन ठाणे नगर पोलिसांनी हिरालाल जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तिच्या तक्रारीची दखल घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरालाल जाधव यांना निलंबित करण्याचा आदेश काढला.