मालमत्ता कर न भरल्यामुळे कारवाई                                  


ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवर्सचा सुमारे 22 कोटी रूपयांचा थकीत मालमत्ता कर तात्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देवूनही  तो न भरल्याने महापालिकेने कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली .  याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक १६३६/२०१७ च्या आदेशाच्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीमार्फत ठाणे शहरात जवळपास ८० ठिकाणी इमारत आणि जमिनीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. 


त्या बदल्यात त्यांच्याकडे एकूण २२ कोटी रुपये थकबाकी प्रलंबित आहे. सदर प्रकरणी मुबई उच्च न्यायालयानेही थकीत रक्कम प्राधान्याने ठाणे महापालिकेस भरण्याचे आदेश रिलायन्स कंपनीस दिले होते .