ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीत ३३ प्रभागांसाठी १३१ जागांसाठी १०८८ अर्ज दाखल झाले आहेत. ५५ अर्ज अवैध असून २२८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. तर ८०५ उमेदवार रिंगणात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे महानगर पालिकेच्या ३३ प्रभागांसाठी १३१ जगासाठी १०८८ अर्ज आले होते. त्यापैकी ५५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. तर २२८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नसले तरी, नगरसेवक होण्याच्या दृष्टीने बंडखोरी करणाऱ्या बंडोबांना थंडोबा करण्यात ठाण्यातील राजकीय पक्षांना एक प्रकारे यश आले आहे.


प्रभाग क्रमांक १९ मधून सेनेच्या नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी माघार घेतली आहे.तर प्रभाग क्रमांक ३ मधून बीजेपीचे उमेदवार जयनाथ पूर्णेकर यांनी आपले भाऊ आणि काँग्रेसचे उमेदवार छत्रपती पूर्णेकर यांना मदत करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक २२ मधून सेनेच्या विद्यमान नगरसेविका पूजा वाघ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बीजेपीचे उमेदवार विकास दाभाडे यांचे स्थान पक्के झाले आहे.पूजा वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी वाघ यांना तिकीट न मिळाल्याने पवन कदम यांना घेराव घातला होता. 


सेनेचे बंडखोर विलास ढमाले यांनी देखील प्रभाग क्रमांक २२ मधून माघार घेतली आहे.तर प्रभाग क्रमांक १६ येथून सेनेचे उमेदवार माणिक पाटील यांच्या विरोधात सेनेचे माजी नगरसेवक मदन कदम आणि त्यांच्या पत्नी नीता कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.