सांगली : जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.


गुन्ह्याची नोंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरले. मात्र ही घटना समजताच तासगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आगे. 


भाजपचा हल्ल्या मागे हात?


तर तासगाव शहरातील विविध विकास कामाचे सव्वा चार कोटींचं टेंडर नगरपालिकेनं काढलं होतं. त्याची ५ मे रोजी संध्याकाळी सहावाजेपर्यंत ऑनलाईन मुदत होती. मात्र, भाजपच्या काही नगरसेवकांनी तासगावचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून ते टेंडर मुदत वाढवून काढा असा दबाव आणला होता. त्यामुळे या हल्ल्यामागे भाजपचा हात नाही ना, अशी चर्चा आहे.