कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय
रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नोटाबंदीमुळे शहरासह ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहार थंडावलेत. रोकड रक्कमेचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नसल्यामुळे बाजार समित्या बंद होत्या. या शेतक-यांना चेकद्वारे पैसे देण्याचा पर्याय देत या समिती सुरु करण्यात आल्या. मात्र बँकाकडून व्यापाऱ्यांना जास्तीचे चेकबुक मिळण्यास अडचण येत असल्याने शेतकऱ्यांना विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.
चेकबूक बरोबर व्यापाऱ्यांना बाहेरगावी पाठवलेल्या मालाचे पैसे मिळण्यासही अडचण निर्माण झालीय. परिणामी व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होतोय. त्यामुळेच बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लिलाव एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.