ठाणे : शहरातील चेक मेट या एटीएम कॅश कलेक्शन कंपनीवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी लुटलेल्या पोलिसांनी ९ कोटी रुपयांपैकी ३ कोटी १२ लाख रुपये जप्त केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच ठाणे, नाशिक आणि कल्याणमधून एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमींदर सिंह यांनी या कटाची माहिती दिली.


शिवाय कंपनीत इतकी कॅश जमा होते..याची कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती, असेही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. यापुढे असे दरोडे पडणार नाहीत यासाठी कॅश कलेकश्न कंपन्यानी पोलिसांना योग्य वेळी खरी माहिती द्यावी जेणे करून अशा घटना टाळण्यास मदत होईल, असं पोलिसांनी म्हटले आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक झायलो, २ इको गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत असून बाकीच्या रोकडप्रकणी या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.