नाशिक : दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीमधील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्चीचा गजानन चौकात धारधार हत्यारानं खून करण्यात आला होता. या प्रकरणी  6 ते 7 जणांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अजित खिच्चीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजितला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


अजितला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकानं मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी करून पोलिसांनी 29 मोबाईल जप्त केले होते. 


गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजितची हत्या आपसातील वैमनस्यामुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. याप्रकरणी सहा ते सात जणांना ताब्यात घेतले आहे.