धुळे : धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियम धाब्यावर बसवत हजारो लिटर दारू प्रशासकीय कार्यालयांच्या आवारातील गटारीत सोडली. विशेष म्हणजे यामुळे परिसरात मद्याचा उग्र दर्प पसरला. गटारीतून वाहत जाणारे मद्य पुढे थेट परिसरात पाझरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उग्र दर्पामुळे सायंकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून बाहेर पडावे लागले.  मद्याचे शेकडो बॉक्स बाहेर काढून गटारीत रिकामे केले जात होते. हे मद्य सुमारे आठ वर्षांपूर्वी जप्त करण्यात आले होते. 


या मद्याची विल्हेवाट लावताना त्यातून मानवी आरोग्याला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मात्र धुळ्यात नेहमीप्रमाणे आपल्या अजब कारभाराचा नमुना उत्पादन शुल्क विभागाने पेश करत प्रशासकीय संकुलातच गटारीत मद्य प्रवाहित करून राज्यात आळशीपणाचा पायंडा पाडला.