बुलढाणा : गोरगरिबांसाठी असलेल्या रेशनच्या धान्याचा बुलढाणा जिल्ह्यात सर्रास काळाबाजार होत आहे. नांदुरा येथे देखील अशाच प्रकारे काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने एका गोदामात दडवून ठेवलेला १८४ कट्टे तांदूळ नांदुरा तहसीलदारांनी जप्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी एका शेतातील गोदामात रेशनचा तांदूळ दडवून ठेवण्यात आल्याची माहिती नांदुरा तहसीलदार यांना एका तक्रारकर्त्याने दिली. त्यावरून तहसीलदारांनी सदर गोदामाची पाहणी केली असता. त्याठिकाणी १८४ कट्टे तांदूळ आढळून आला सोबतच शासकीय तांदुळाचा बारदाना देखील मिळून आला. 


त्यामुळे हा तांदूळ रेशनचा असल्याच्या संशयावरून तहसीलदारांनी सदर तांदूळ जप्त केला असून पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ओम राठी यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.