मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा, अन्यथा आम्हाला तसे आदेश द्यावे लागतील, असा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीमध्ये तीन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षीय तेजस हालेचा बळी घेतला होता. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना न केल्यानं तेजसचा बळी गेला. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून प्रशासनानं 20 लाख रूपये द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तेजसचे वडील मारुती हाले यांनी अॅड. पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत हायकोर्टात केली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हे आदेश दिलेत.