पुणे : पुण्यात दिवसाकाठी लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बसेसच्या फिटनेसविषयी प्रशासन गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील १७६ बसेसना आरटीओचं प्रमाणपत्रच घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या बसेस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. त्या व्यतिरिक्त ताफ्यातल्या कंत्राटी बसेसबाबतची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही असंही उघड झालंय. पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली.


बसेस रस्त्यात बंद पडणे, बसेसना अपघात होणं एवढंच नाही तर धावती बस जळून खाक होणं अशा घटना घडल्या आहेत. बसेसच्या फिटनेसबाबत दाखवण्यात आलेल्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.