औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे. समृद्धी नावाच्या वाघीणीनं तीन बछड्यांना जन्म दिलाय. हे तीनही बछडे आता तीन आठवड्यांचे झाले असून ते सुदृढ आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी दोन वेळा बछड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चौकशीनाट्यही रंगलं होतं. त्यामुळे यावेळी बछड्यांचा जन्माचं गुपित ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता बछडे ठणठणीत असल्यानं लवकरच त्यांना पिंज-यातून बाहेर काढण्यात येणार आहे.


वाघाचे हे बछडे अगदी लहान असले तरी कॅमेरा पाहून मात्र त्यांनी गुरगुरायला सुरुवात केली. अगदी त्यांच्या छोट्याशा आवाजातून गुरगरण्याचं सगळ्यांनाच कौतुक आहे. यातील दोन पिल्लं पिवळ्या रंगाची आहेत तर एक पांढरा रंगाचं आहे. त्यामुळे सिद्दार्थ उद्यानाला एक पांढरा वाघ सुद्धा मिळाला आहे. आता लवकरच या नव्या पाहूण्यांना भेटण्यासाठी उद्यानात गर्दी वाढणार आहे.