मुंबई : राज्यातल्या वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांच्या मतदान कालावधीमध्ये, राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. त्यानुसार या तीन महापालिकांसाठी मतदानाची वेळ ही सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे सहा अशी असेल.


तीनही ठिकाणी बुधवारी 19 एप्रिलला मतदान होत आहे. या तीनही शहरात अंतिम प्रचाराची कालमर्यादा सुद्धा संध्याकाळी साडे सहापर्यंत वाढवण्यात आली आहे.