नाशिक : ग्रामीण भागात आजही उपचारांअभावी अनेक मुलं गंभीर अवस्थेत आहेत. अनेक कुटुंबं अशी आहेत की त्यांच्याकडे मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसेच नाहीत. अशा अनेक उपेक्षितांना नाशिक शहरात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिन्नर तालुक्यातील  दापूर गावाचे हे अर्जुन गणपत आव्हाड. त्यांच्या संदीप या मुलाला गेल्या वीस वर्षापासून धड चालताही येत नाही. महागडे उपचार करणं त्यांच्या आवाक्यातच नव्हतं. अशा वेळी त्यांनी हा आरोग्य कुंभमेळा आशेचा किरण ठरला आहे.


अशी शेकडो कुटुंबं नाशिक गोल्फ मैदानावर जमली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार इथे सेवा देणारे रामेश्वर या सर्वांकरता देवदूतच ठरले आहेत. हा महाआरोग्य मेळा पंचक्रोशीतल्या गरजू तसंच उपेक्षितांसाठी मोठा आधार ठरला. असे आरोग्य मेळावे प्रत्येक जिल्ह्यात होणं गरजेचं आहे.