तुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.
नवी मुंबई : एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियंत्रक दर्जाचा एक अधिकारी आणि वाहकाला बडतर्फ करण्यात आलंय. एनएमएमटीला लागलेली उतरती कळा रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारंवार गैरहजर राहणारे अधिकारी आणि कर्मचा-यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याआधीसुद्धा एनएमएमटी मधील 24 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा 59 वाहक आणि 66 चालकांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. दरम्यान एनएमएमटीच्या 15 पर्यवेक्षक आणि कर्मचा-यांची चौकशी सुरु आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे एनएमएमटी प्रशासनाला चांगलाच दणका बसला आहे.