उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय. मोदी लाट असतानाही निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर शहरात सर्वाधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला पालिका निवडणुकीत सर्व वॉर्डात उमेदवारसुद्धा उभे करता आलेले नाहीत. त्यातच ज्योती कलानी निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहेत. मुलगा ओमी कलानीच्या राजकीय भवितव्यासाठी ज्योती कलानी प्रचारापासून दूर असल्याचे बोललं जात आहे.


मात्र राष्ट्रवादीचे नेते ही वस्तुस्थिती मानण्यास तयार नाहीत.अजूनही ज्योती कलानी राष्ट्रवादीत आहेत असं सांगण्यातच नेते धन्यता मानताहेत. दुसरीकडे ज्योती कलानी यासुद्धा माध्यमांसमोर येणं टाळत आहेत. कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचं सांगत असतानाच मतदारांनी जास्तीत मतदान करावं यासाठी रॅली काढणार असल्याचं ज्योती कलानी यांनी म्हटले आहे.