मुंबई : दादार-सावंतवाडी या राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ या नावाने धावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात धावणाऱ्या दादर - सावंतवाडी  या राज्यराणी एक्स्प्रेसला कवी केशवसुत यांच्या तुतारी या कवितेचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे दादर - सावंतवाडी या गाडीचे नाव बदलून आता ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे.


मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही घोषणा केली आहे. सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना कमी वेळेत कोकणात जाणे सोपे झाले होते. प्रवाशांनीही दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचा पसंती मिलत आहे.


दादरमध्ये रेल्वे मंत्री सुरेश यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचे ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात आले. प्रसिद्धी मराठी कवी कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) यांच्या सन्मानार्थ या रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे.