परभणी : परभणी जिल्ह्यातील 7 नगर पालिकांच्या आज निवडणुका सुरू असून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र गंगाखेड एका ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेंकात भिडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी गंगाखेड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील शनिमंदिर परिसरातल्या उर्दू स्कूलमधील बूथ क्रमांक 3 वर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकात भिडले. 


सकाळी दहाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदान करण्यासाठी वयस्कांना बूथवर घेऊन जात असतांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यातच पर्यवसन बाचाबाचीमध्ये होऊन किरकोळ हाणामारीत झालं. 


त्यामध्ये काँग्रेसचे नेते बाळकाका चौधरीसह इतर दोघे किरकोळ जखमी झाले. त्यामुळं मतदान केंद्रावर काही वेळ तणावाच वातावरण निर्माण झालं होत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.