वाघाच्या तावडीतून २ जण असे बचावले
वाघाच्या तावडीत अडकलेल्या 2 ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिलंय. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघीण 2 बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघीण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली.
चंद्रपूर : वाघाच्या तावडीत अडकलेल्या 2 ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिलंय. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघीण 2 बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघीण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली.
भेदरलेल्या दोन्ही ग्रामस्थांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच्या झाडाचा आश्रय घेतला. दोघंही झाडावर चढले आणि वाघिण जाण्याची वाट पाहू लागले. मात्र काही केल्या वाघिण तिथून हटेना.
सुदैवानं जंगलात मोबाईलची रेंज असल्याने दोघांनी इतर ग्रामस्थांना फोन करुन सगळी परिस्थिती सांगितली. यानंतर दोघांची सुटका करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी तिथे पोहचले. वनविभागाने या दोघांनाही जेसीबीच्या मदतीने खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.
खाली वाघीण आणि हवेत जेसीबीचा पंजा आणि त्या पंजात हे दोन ग्रामस्थ अशा चित्तथरारक स्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं..