पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या पेठरांजणी गावात आणखी एका मुलीचा कुपोषणानं मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोशनी सवरा असं या दोन वर्षाच्या मुलीचं नाव आहे. याआधी ईश्वर सवरा आणि सागर वाघ या दोघांचा मृत्यू झालाय. हे दोघेही मोखाडा तालुक्यातले आहेत.


गेल्या पंधरा दिवसातला पालघर जिल्ह्यात कुपोषणानं झालेला हा तिसरा मृत्यू आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत तिघांचा कुपोषणाने मृत्यु झालाय. ईश्वर सवरा व सागर वाघ हे दोघे मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचयतमधील तर आता वाडा तालुक्यातील पेठरांजणी गावातील रोशनी सवर या दोन वर्षांच्या चिमुकलीचा कुपोषणाने मृत्यू झाला.