सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज
सातारा नगरपालिका ताब्यात घेतल्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आलेल्या निकाला बाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि 40 पैकी 23 उमेदवार निवडून आलेले असतानाही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा : सातारा नगरपालिका ताब्यात घेतल्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आलेल्या निकाला बाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि 40 पैकी 23 उमेदवार निवडून आलेले असतानाही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बातमीत उदयनराजे यांचा व्हिडिओ आहे तो नक्की पाहा...
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मी सातारकरांवर खूप प्रेम करत असल्याचे आणि भविष्यात सुद्धा माझ्यात बदल होणार नाही. हे त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये कॉलरवर करून सांगितले आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाबत बोलताना प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि एवढ्या मोठ्या म्हणजे राजघराण्यातील व्यक्तीचा पराभव होणे म्हणजे हा लोकशाहीचा विजय असल्याचे खा. उदयनराजे बोलले आहेत. त्यावेळी बोलताना बंधू आ. शिवेंद्रराजे भोसले याना टोला ही लगावला आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले हे बारामतीचा दावणीला बांधलेले आहेत,
नोटा बंदी बाबत लवकरच आंदोलन सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी घोषित करून टाकले आहे.