पुणे :  भाजपने  तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मी सभेच्या ठिकाणावर येत असताना मला एक एसएमएस आला, त्यात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले.  इंदिरा गांधींच्या नावाने बोंबलत होते. आता ही आणीबाणी नाही तर काय आहे.  १९, २० आणि २१ तारखेला सामना छापायचा नाही. पण तुमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोंबलत फिरताहेत त्याचं काय...


ही आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे. तीन दिवस सामना छापायचा नाही तर म्ग आचारसंहितेच्या काळात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडाला बुच मारायचे काय असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी सभेत विचारला.