उद्धव ठाकरेंचा पुन्हा भाजपला टोला
महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवू असा सज्जड इशारा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
मुंबई: महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवू असा सज्जड इशारा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शिवेसेनेकडून अंधेरीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जे शक्ती प्रदर्शन करू पाहता आहेत, त्यांनी आधी अखंड महाराष्ट्रासाठी शपथ घ्यावी असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला हाणला. यावेळी पालिका निवडणूक आणि अखंड महाराष्ट्रासंदर्भातले बाळासाहेब ठाकरेंचे विचार उपस्थितांसाठी पुन्हा एकदा दाखवण्यात आले.