ठाणे : ठाण्यातल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण लवकरच ठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितलं.


ठाण्यातल्या नगरसेवकांना भेटल्यानंतर आज पक्षाची कोणतीही भूमिका स्पष्ट होणार नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. झालं गेलं विसरून जाण्याच्या गडकरींच्या सल्ल्यावर उद्धव यांनी जय महाराष्ट्र म्हणत हात जोडले. पण अशोक चव्हाणांच्या ऑफरबाबत मात्र त्यांनी जरा थांबा, असं सांगितलं. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडून काँग्रेसचा पाठिंबा घेण्याबाबत उद्धव सकारात्मक विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे.