उल्हासनगर : दुचाकी पार्किंगच्या वादातून दुकानाच्या  मालकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. हा सर्व प्रकार दुकानातील cctv मध्ये कैद झाला. दुकाना समोर दुचाकी पार्क करू दिली नाही म्हणून हा हल्ला करण्यात आला.  निर्मला ज्युस सेंटर चे मालक पवन गुप्ता आणि कामगार इशाद अली या दोघांवर हा चाकू हल्ला करण्यात आला.  


8 ते 9  हल्लेखोरांनी हा चाकू हल्ला केला असून या हल्ल्यात मालक आणि कामगार दोघेही गंभीर जखमी झालेत. या दोघांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.