पुणे : सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये आज दुपारी 4.30 च्या सुमारास पाऊस पडला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मागील दोन दिवसात मराठवाडा, नाशिक, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाबरोबरच काही ठिकाणी गारपीटही झाली.


पुण्यात सिंहगड रस्ता परिसर, बिबवेवाडी भागात पावसाचा जोर जास्त होता. कोथरुडसह मध्यवर्ती पुण्यातही पाऊस पडला. 


पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात मंगळवारी, तर मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.