वसई : वसई पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंदन माजलं होतं. सभापतींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अधिकारी आणि सदस्यांनी सभात्याग केला. पंचायत समितीतर्फे विविध घटकांसाठी अनुदान तत्वावर वित्तीय मंजुरीसाठी शनिवारी 1 एप्रिलला बोलावली होती. बहुजन विकास आघाडीचे 6 श्रमजीवी संघटवेचे 2 असे 8 सदस्य आहेत. 


बहुजन विकास आघाडीच्या चेतना मेहर सभापती आहेत. वसई पंचायत समितीत सहा महिन्यांपासून प्रशासन विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष सुरूय.  याचे पडसाद शनिवारच्या मासिक सभेत दिसले. या सभेतल्या रणकंदनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.