विरार : चोर समजून एका अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली. येवढंच नाही तर ग्रीलला बांधून तिनं चोरी केली असं तिच्याकडून वदवून घेण्यात आलं. याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.  विरारमध्ये हा सर्व प्रकार घडलाय. कारगीलनगरमधल्या जयदीप चाळीत लोकांनी तिला बांधून मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस हवालदार आल्यानं या मुलीची सुटका झाली. पण येवढं होऊनही या प्रकरणाबाबत विरार पोलीस ठाण्यात साधी नोंदही करण्यात आलेली नाही. एका अल्पवयीन मुलीला चोर असल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण केली जाते पण याबाबत पोलीस काहीही पावलं उचलताना दिसत नाहीत. 


ही मुलगी कोण, कसली चोरी झालीय़ याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण अशा पद्धतीनं जर एखाद्या मुलीला मारहाण होत असेल तर त्याविरोधात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.