वारकरी संप्रदायाची आधुनिकतेकडे वाटचाल
महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवाचे प्रतिनिधित्व करणा-या वारकरी संप्रदायाची वाटचाल आता आधुनिकतेकडे होत आहे. राज्यात यापुढे संत वाङ्मयाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवाचे प्रतिनिधित्व करणा-या वारकरी संप्रदायाची वाटचाल आता आधुनिकतेकडे होत आहे. राज्यात यापुढे संत वाङ्मयाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे.
औरंगाबादमधल्या पैठणच्या शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याकरता संत एकनाथ डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा असेल तर आळंदी, देहू किंवा पैठण अशा ठिकाणी प्रत्यक्ष राहून ते घ्यावं लागायचं. पण आता ऑनलाईनद्वारे ही सोय मिळू शकणार आहे.