मुंबई : ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या आदेशावरुन मीरा भाईंदर महापालिकेत नव्या वादाला तोंड फुटलंय. कचरा वेगळा न केल्यास नळ कनेक्शन तोडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून स्थानिकांनीही याला विरोध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातला वाढता कचरा म्हणजे महापालिकांची डोकेदुखी बनलीये. त्यामुळंच मीरा भाईंदर महापालिकेनं ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं फर्मान काढलंय. याबाबतच्या नोटीस त्यांनी शहरातल्या इमारतींना दिल्या आहेत.


ओला आणि सुका कचरा वेगळा करा अन्यथा कचरा उचलणार नाही अशी धमकीवजा नोटीस देण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या या नोटीसीवर विरोधक आणि रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात आवाज उचलणार असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलंय.


दुसरीकडे महापालिकेच्या आवारातच ओला आणि सुका कचरा एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना हळूहळू सवय लागेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केलाय. तसंच ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही तर दंड आकारण्यात येणार नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे.