पाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी
पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
सांगली : जिल्ह्यातील पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
यावेळी दगडफेक, एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर शहरातील वातावरण तंग झालं आहे. यावेळी एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठा पोलीस तैनात करण्यात आला आहे. मागील काही दिवसापासून पलूसमध्ये पाणी टंचाई आहे.
या पाणी प्रश्नासबंधी ग्रामस्थांनी काल एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक विशाल दळवी हे स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगावार धावून गेले असा विरोधकांचा आरोप आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक, एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या आहेत.