मान्सून लांबल्यामुळे राज्यावर पाणीसंकट
मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणीसंकट गंभीर झालंय. पुण्यात 30 जूनपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
पुणे : मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणीसंकट गंभीर झालंय. पुण्यात 30 जूनपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा संपत आलाय. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत पाणीनियोजनासंबंधी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय.
पावसानं ओढ दिल्यानं सगळ्या राज्यावरच पाणीसंकट आहे. कोल्हापूरातही दोन दिवस पाणीपुरवठा कमी होणार आहे. शहरात कमी पाणीपुरवठा होणार आहे.