पिंपरी : उत्तरप्रदेश निवडणुकीचा दाखला देत राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर कायम राज्य सरकारला पाठिंबा देऊन असं अश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीच्या सभेत दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवडमधील विनापरवाना बांधकामाच्या मुद्दा उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, विनापरवाना बांधकामांना शास्तीकरात सवलत देण्याचा 'जीआर' मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत नुसता दाखविला. जीआर दाखविण्याची एवढी घाई का करता? त्याची अंमलबजावणी कोण आणि कधी करणार याची उत्तरे पहिली द्या. 


सरकारी कार्यालयात देवदेवतांच्या तसबिरी हटविण्याच्या 'जीआर'ची अंमलबजावणी लगेच होते, मग शास्तीकरात सवलत देण्याच्या 'जीआर'ची का नाही? शिवसेनेच्या विरोधामुळेच सरकारी कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरींना बंदी घालणारा 'जीआर' केराच्या टोपलीत गेला. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असली फालतू दादागिरी सहन करणार नाही, असेही उद्धव यांनी सांगितले.


तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष लढलो त्यांच्यासोबत सेटींग करता अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. ते पुण्यातील सभेत बोलत होते.