लोणावळा : सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातच दरड कोसळण्याचा धोका असल्याने विक्एन्डला येथील सर् पॉईंटस् पर्यटकांसाठी बंद असणार आहे. कोणीही या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, लोणावळा परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय. या पावसामुळे पवनानगर कडून आपटी, गेवेंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला असल्याने या गावासोबतचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावाकडे पर्यटनास आलेले काही पर्यटक अडकले आहेत. 


भूशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला आणि भाजे लेणी पर्यटनास दोन दिवस बंद राहणार आहेत. याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. लोणावळा शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने भूशी धरण १००टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या मुख्य भिंतीवरून ओसंडून वाहत आहे. 


तसेच वाढते धुके आणि अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या शक्यतेने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव धरणासह  लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला आणि भाजे लेणी आदी पर्यटन पॉइंट्स पर्यटकांसाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.


यासंदर्भात माहिती लोणावळा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी दिली. तसेच पर्यटकांनी या पॉईंटला भेट न देण्याचे आवाहन केले आहे.