पुणे : फॅमिली बिझनेस अर्थात कौटुंबिक व्यवसाय ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. यामध्ये अख्खं कुटुंबच एखाद्या उद्योग व्यवसायाशी निगडीत असतं. पण पुण्यात एक अख्खं कुटुंबच घरफोडीचं काम करतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानाभाऊ लंके असं या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. पुणे पोलिसांनी या नानाभाऊ लंकेला अटक केलीय. त्याच्याकडून कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप आणि एक गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय. 


नानाभाऊ लंकेची पत्नी आणि मुलंही घरफोडी करायचे. तर घरफोडीत लुटलेल्या मुद्देमालाची नानाभाऊ लंके विल्हेवाट लावायचा. नानाभाऊ लंकेच्या मुलावर घरफोडीचे सहा गुन्हे दाखल आहेत. तर उघड झालेल्या एकंदर १४ गुन्ह्यांमध्ये, लंके कुटुंबातल्या सदस्यांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. 


नानाभाऊ लंकेवर खालील गुन्हे आहेत
 
-  घरफोडी, दरोडा , खंडणी आणि बलात्काराचे गुन्हे नानाभाऊ लंकेच्या विरोधात दाखल आहेत. 
- मारहाण आणि फसवणुकीचा देखील गुन्हा त्याच्या विरोधात दाखल आहे. 
- या गुन्ह्यामुळं त्याला एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आलं होतं.