नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात चांगलीच आग पाखड करायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत धुळे जिल्ह्यात सरकारची स्तुती करून गेल्यानंतर त्यांचे नेते राजू शेट्टी यांनी मात्र नंदुरबारात सरकारला धारेवर धरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे आधीग्रहण सुरु आहे ते चुकीच्या पद्धतीने आहे. सरकार विकासाच्या नावाने शेतकऱ्याचे थडगे बांधुन त्यांवर आपल्या विकासाचे इमले बनवत आहे मात्र सरकार शेतकऱ्याचा मर्जीच्या विरोधात एक इंचही जमिनीचे अधिग्रहण करू देणार नाही.


या प्रश्नी शेतकऱ्यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. एकाच पक्षातील सदाभाऊ यांची आणि त्यांचे नेते राजू शेट्टी यांची भूमिका परस्पर विरोधी असल्याने या दोन्ही नेत्यांपैकी खरं कोण बलतोय हे मात्र शेतकऱ्यांना कळेनासे झाले.