नंदुरबार : एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मका विकून हे पैसे या महिलेने बँक ऑफ बडोदा बँकेत टाकले असल्याचं सांगण्यात येत आहे. या बँकेतून या महिलेला 10 हजार रुपये मिळाले. 


जनधनमधून महिन्याला अकाऊंटमधून 10 हजारच निघतील, असे बँक अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानंतर, नैराश्यातून या महिला शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच तणावातून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केला आहे.