नाशिक : तत्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज अखेर स्वराज्य संघटनेच्या महिलांना प्रवेश मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या गोंधळानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्या पोलीस बंदोबस्तात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात घुसल्या. पोलिसांच्या सुरक्षेत आज स्वराज्य संघटनेच्या वनिता गुत्ते यांनी सगळ्यात आधी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. 


सकाळी सहा ते सात या वेळेतच भाविकांना गाभाऱ्यांना काल याच संघटनेच्या महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या महिलांना मारहाण करण्यात आली होती. 


याप्रकरणी माजी नगराध्यक्षासह १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज त्र्यंबकेश्वर बंदची हाक देण्यात आलीय.