चंद्रपूर : उच्चशिक्षित तरुणीनं नोकरी लागत नसल्यानं भोंदूबाबाचा आसरा घेतला. पण वेळीच सावध झाल्यानं या बाबाला बेडया ठोकण्यात आल्या. दरम्यान, एका तरुणीला विवस्त्र करण्याचा प्रकार या भोंदूने केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर शहरातल्या वरोरामधल्या एका युवतीला नेकरी लागत नव्हती. त्यासाठी मालवीय नगरमधल्या सलीम शेख बाबाकडे जा असा सल्ला, विनोद आणि अश्विनी गोटेफोडे या दाम्पत्यानं तिला दिला. 


भोंदूकडे या तरुणीला विवस्त्र करून तिच्यावर कथिक मंत्रांचा झाडू फिरवण्यात आला. त्यानंतर तिला पुन्हा दर्ग्यात बोलावण्यात आला. पण या तरुणीला ही भोंदूगिरी लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून सलीम शेख या भोंदू बाबाला आणि गोटेफोडे दाम्पत्याला अटक केलीय.