डोंबिवली : महिला मंदिर प्रवेशावरून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनानी आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील मंदिरात आंदोलन सुरु केलं असतानाच महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी असल्याचा फलक डोंबिवलीच्या काही मंदिर प्रवेश दारावरच लावल्यामुळे डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 


डोंबिवली पूर्वेकडील कोपर गावात असणाऱ्या गावदेवी मंदिर, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिरात हे फलक लावण्यात आलेत. मंदिराची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण सबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी दिलं आहे. तर विश्वास्तांच्या निर्णयाला विविध महिला संघटनांनी विरोध दर्शवला आहे.