रायगड : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा इथं तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये मंगळवारी भीराचा दुसरा क्रमांक होता. न्यूझीलंडमधल्या सामोआमध्ये जगातील सर्वाधिक 49.6 अंश सेल्सिअस तापमान होतं. 


पाण्यावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या भीरा इथं कमाल तापमान नेहमीच जास्त राहतं. मात्र यावेळी अकोल्याला मागे टाकत भीरामध्ये सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं.